१ रूपयाचं ते नाणं बनवू शकतं तुम्हाला मालामाल !

308

१ रूपयाचं ते नाणं बनवू शकतं तुम्हाला मालामाल ! श्रीमंत होण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, श्रीमंत होणं तसं इतकं सोपं नाहीये. एकतर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कष्ट करावे लागतात. नाहीतर अचानक नशीब चमकावं लागतं. मात्र, प्रत्येकाचं नशीब चमकलं तर कसं होईल? पण एक मार्ग आहे. जर तुमच्याकडे जुनं १ रूपयाचं नाणं असेल तर तुम्हीही श्रीमंत बनू शकता. मात्र, ते नाणं स्पेशल असायला हवं. १ रूपयाचं नाणं तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण असं होऊ शकतं. त्यासाठी तुमच्याकडे असलेलं १ रूपयाचं नाणं हे स्पेशल असलं पाहिजे. असं नाणं जर तुमच्याकडे असेल तर त्याची ३ लाख रूपयांपर्यंत किंमत मिळू शकते. आंध्र प्रदेशच्या व्यापा-याकडे असेच कलेक्शन आहे. ती नाणी त्याने ३ लाखांमध्ये विकली. अशी नाणी ऑनलाईन खरेदी केली जातात.

आंध्रप्रदेशमध्ये नाणी विकणा-या या व्यापा-याचं नाव आहे बी. चंद्रशेखर. चंद्रशेखर रस्त्याच्या कडेला विंटेज नाणी विकण्याचे स्टॉल लावतात. त्यांचा या स्टॉलला वर्ल्ड तेलगु कॉंन्फ्रेन्समध्ये होत असलेल्या एक्झिबिशनमध्ये येणारे लोकही भेट देतात. अनेकांना आवड असते ते विकत घेतात. आता तुम्हाला विचार पडला असेल की, जे नाणं बी. चंद्रशेखर यांनी ३ लाखात विकलं त्यात एवढं काय खास होतं. या नाण्याची खासियत म्हणजे १९७३ मध्ये मुंबई मिंटमध्ये बनवण्यात आलं होतं. मुंबई मिंट ही भारतातील सर्वात जुनी मिंट आहे. या मिंटचं निर्माण इंग्रजांनी केलं होतं. ही तेव्हा गोष्ट आहे जेव्हा मुंबई व्यापारासाठी सर्वात मोठं ठिकाण होती. इथे तयार हालेल्या नाण्यांवर डायमंड शेप असलेला ए डॉट होता. एका मुलाखतीत चंद्रशेखर यांनी सांगितले की, त्याच्याकडे साधारण ६५ वर्ष जुनी नाणी आहेत.

चंद्रशेखर यांनी सांगितले की, त्यांनी असंच एक एक रूपयाच नाणं विकलं आणि त्याची किंमत २ लाख इतकी मिळाली. हे नाणं १९८५ साली तयार करण्यात आलं होतं. या नाण्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो होता. हे नाणं कोलकात्याच्या मिंटमध्ये बनवण्यात आलं होतं. इतकेच नाहीतर दोन पन्नाच पैशांची नाणीही त्यांनी विकली आहे. अशा नाण्यांसाठी त्यांना ५० हजार ते ६० हजार रूपये इतके पैसे मिळतात.