जेवणानंतर लगेच या पाच गोष्टी करणं असतं तुमच्यासाठी धोकादायक !

2161

जेवणानंतर लगेच या पाच गोष्टी करणं असतं तुमच्यासाठी धोकादायक ! आपल्या दैनंदिन गोष्टींबद्दल अनेकांना काहीच माहिती नसतं. सांगायचं झालास तर सर्वच लोक रोज जेवण करतात आणि आपापली वेगवेगळी कामे करायला लागतात. मात्र, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शारिरीक समस्या टाळण्यासाठी जेवण झाल्यावर काय करावं आणि काय करू नये, असे काही नियम आहेत. त्यातीलच जेवणानंतर लगेच कोणत्या गोष्टी करू नये, याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या गोष्टींचा सल्लाही अनेकदा डॉक्टर देतात. पण जनरली या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात.

१) लगेच झोपू नये:
अनेकांना जेवण झाल्या झाल्या झोपण्याची सवय असते. मात्र, हे चुकीचं आहे. कारण अन्नाचं पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. थोडावेळ फिरून या.

२) सिगारेट ओढू नये:
अनेकांना जेवल्यावर लगेच सिगारेट हवी असते. पण असे करणे जास्त घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.

३) लगेच आंघोळ करु नये:
आंघोळ करताना पाण्यामुळे शरिरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.

४) जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नये:
जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत

५) चहा पिऊ नका
चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.