प्रेग्नेंट बायकोसमोर नवऱ्याची चाकूने वार करून हत्या, त्यांची चुकी त्यांने प्रेम केलं !

5932

प्रेग्नेंट बायकोसमोर नवऱ्याची चाकूने वार करून हत्या, त्यांची चुकी त्यांने प्रेम केलं ! गरोदर पत्नीसमोर पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला असून, सासरच्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. पती, पत्नी डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णालयातून जात असताना हा हल्ला झाला. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं आज दिवसाढवळया एका प्रेम विवाहीत जोडपं जात असतांना पतीची पत्नीसमोर धारदार कोयत्याने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीये. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुलीच्या वडिलासह काकाला या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा आरोपी बनवलंय.

मिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मिञ प्रणयने आठ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही. घरदार सोडून दोघांचा तेलंगाणाच्या मिर्यालगुडा भागात दोघे गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही येणार आहे. नव्या पाहुण्याचे स्वप्न पाहुन दोघेही आनंदी होती. आज सकाळी पाच महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नी अमृताला घेऊन स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रणयवर अज्ञात इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केल्या. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला. पतीवर झालेल्या हत्येने अमृताही जागेवर बेशुद्ध झाली. हल्ला करणारा हल्लेखोर तेथून पळून गेला. स्थानिकांनी धावाधाव करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अमृताच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमृताच्या वडील आणि काकांवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. आपल्या मुलींचा संसार उद्धवस्त करणारे हे दोघेही फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत. तसंच या हल्ल्यात प्रणयच्या सासऱ्यांचा काही हात आहे का याचीही तपासणी करत आहेत. दरम्यान प्रणयच्या कुटुंबियांना त्याचा सासरा मारुती राव यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे त्यांचाच हात असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.