घरीच बनवा पतंजलीसारखे एलोवेरा जेल, अशी आहे प्रोसेस. स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा !

396

घरीच बनवा पतंजलीसारखे एलोवेरा जेल, अशी आहे प्रोसेस. स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा ! एलोवेरा जेल म्‍हणजेच कोरफडीचे जेल त्‍वचा आणि केसांसाठी अतिशय लाभदायी असते. कारण यामध्‍ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A,B,C,E आणि मिनरल्‍स असतात. मुलायम त्‍वचा आणि केसांसाठी हे अतिशय आवश्‍यक असते. यामुळेच अनेक सौंदर्य कंपन्‍या एलोवेरा जेल बनवतात. यामध्‍ये सर्वात प्रसिद्ध आहे पंतजलीचे अॅलोवेरा जेल. हे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले असते. यामध्‍ये त्‍वचेसाठी हेल्‍दी असे काही घटकही मिसळलेले असतात. मात्र मार्केटमधून अॅलोवेरा जेल खरेदी करणे तुमच्‍यासाठी खर्चिक असू शकते. अशावेळी तुम्‍हाला घरीच नैसर्गिक पद्धतीने व त्‍याच दर्जाचे अॅलोवेरा जेल बनवता आले तर याचा तुम्‍हाला जास्‍त फायदा होईल.

सर्वप्रथम कोरफडीच्‍या झाडाचा एक भाग चांगल्‍या पद्धतीने कापून घ्‍या.नंतर त्‍याचे काटे चाकूने काढून घ्‍या. लक्षात असू द्या हे करताना चाकू, आपले हाथ तसेच या कृतीमध्‍ये वापरात येणारे सर्व भांडे स्‍वच्‍छ असावीत. तसे नसल्‍यास जेल लवकर खराब होईल. नंतर कोरफडीच्‍या भागाला मधून कापा. त्‍याचे दोन भाग करा. आता सावधनतापूर्वक एका चाकुच्‍या मदतीने त्‍यातील जेल वेगळे काढा. यामुळे तुम्‍हाला फ्रेश अॅलोवेरा जेल मिळेल. जे थोडेसे पातळ असेल. नंतर एका ग्राईंडरमध्‍ये अॅलोवेरा जेल टाकून मिक्‍सरमध्‍ये काही सेकंद त्‍याला मिक्‍स करुन घ्‍यावे. यामुळे ते आणखी थोडेसे पातळ बनेल. नंतर त्‍याचे काटे चाकूने काढून घ्‍या. लक्षात असू द्या हे करताना चाकू, आपले हाथ तसेच या कृतीमध्‍ये वापरात येणारे सर्व भांडे स्‍वच्‍छ असावीत. तसे नसल्‍यास जेल लवकर खराब होईल. नंतर कोरफडीच्‍या भागाला मधून कापा. त्‍याचे दोन भाग करा.