घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे, काय आहे तमालपत्र ?

329

घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे, काय आहे तमालपत्र ? तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे. तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र याचा आणखीही एक फायदा आहे. तमालपत्र एका भाड्यात ठेवून जाळा. त्यानंतर जो काही चमत्‍कार होईल ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. घरात तमालपत्र जाळल्याने केवळ घर सुगंधितच होणार नाही तर यामुळे तणावही कमी होण्यास मदत होईल.

घराला सुगंधित बनवण्यासाठी लोक विविध फ्रेशनरचा वापर करतात. मात्र या महागड्या उत्पादनांचा वापर कऱण्याऐवजी तमालपत्राचा वापर करा. यामुळे घर तर सुगंधित होतेच मात्र त्याचबरोबर तणावही कमी होतो. याच्या सुगंधामुळे थकवा आणि चिडचिडेपणा कमी होतो. तसेच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते. तमालपत्र आजूबाजूच्या वातावरणातील दूषित कण कमी करतात. याशिवाय घरात झुरळे झाली असल्यास तमालपत्रे जाळून कोपऱ्यात ठेवा. यामुळे झुरळे कमी होतात. मात्र एकावेळी भरपूर तमालपत्रे जाळू नका. एका वेळी एकच पान जाळा.

तमालपत्राचे फायदे :
1. तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

2. तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे.