तुम्हांला माहित आहे का कुत्रे धावत्या गाडी मागे का पळतात ? जाणून घ्या !

9182

तुम्हांला माहित आहे का कुत्रे धावत्या गाडी मागे का पळतात ? आपल्या प्रत्येकालाच एका गोष्टीचं आश्चर्य असतं की कुत्रे धावत्या गाडीमागे का भुंकतात आणि धावतात? आपण अनेकदा पाहिलं आहे रात्रीचंच नव्हे तर अगदी भर दुपारी कुत्रे टू व्हिलर किंवा फोर व्हिलर चालत्या गाड्यांमागे धावत सुटतात. अगदी शांत झोपलेला कुत्रा देखील अचानक उडतो आणि गाडी मागे धावत धावत एका विशिष्ट अंतरापर्यंत जातो आणि मग पुन्हा आपल्या जागी येऊन शांत झोपतो. बराचवेळा रस्त्यावरील प्रवाशी हा सारा प्रकार बघून हसत बसतात. पण कुत्रे असे अचानक का धावायला लागतात? याचं कुणी कारण शोधून काढलं आहे का? आमच्याकडे अशी काही कारणं आहेत ज्याच्यावर तुम्ही नक्की विचार करू शकाल.

१. कुत्रे धावण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा गाड्यांमुळे कुत्र्यांना इजा झालेली असते. त्यामुळे तो राग व्यक्त करण्यासाठी कुत्रे धावत्या गाडीमागे पळतात.

२. तसेच शिकार करण्याच्या प्रवृत्तीमुळे देखील कुत्रा धावत्या गाड्यांच्या मागे धावण्याची शक्यता आहे. आपल्यापासून दूर पळणाऱ्या गोष्टीला कुत्रे शिकार समजतात. त्यामुळे कुत्रा गाडीच्या मागे पळतो.

३. काही कुत्र्यांची गोष्टच अजब असते. तर काही कुत्रे फक्त मारूती कारच्या मागे धावतात. तेव्हा त्याने असं सांगितलं की, त्याच्या कुत्र्याला मारूती कारने टक्कर दिली होती. त्यामुळे तो मारूती कारच्या मागे पळतो.

४. सर्वात महत्वाची गोष्ट कुत्रा जेव्हा पोटभर जेवून रस्त्यावर शांत झोपतो. तेव्हा हिच वाहनं त्यांच्याजवळ जाऊन मोठ्याने हॉर्न वाजवतात. आणि कुत्र्यांना आवाज जरा जास्तच ऐकू येतो. तेव्हा अचानक झोपेतून उठलेला कुत्रा गाडीमागे धावतो.

५. तसेच कुत्र्यांना पकडायला येणारी गाडी देखील चारचाकी असते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की प्रत्येक फोर व्हिलर ही कुत्रे पकडायची गाडी आहे.

६. तसेच काही कुत्र्यांना तर अगदी मजेशीर वाटतं. त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा हा कोणतातरी मोठा प्राणी आहे. पण तो आपल्या अंगावर येत नाही तर चला आपणच त्याच्यावर ओरडूया म्हणून कुत्रे असे वागतात.