साऊथच्या या अभिनेत्री चे शिक्षण जाणून तुम्ही पण थक्क व्हाल!

327

जाणून घ्या साऊथच्या या अभिनेत्री चे शिक्षण किती आहे ? साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी केवळ साऊथमध्येच नव्हे तर देशभरात ओळखल्या जातात. या अभिनेत्री तामिळ-तेलगूमध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालतात. तसेच काही अभिनेत्री बॉलिवूडमध्येसुध्दा खूप नाव कमावतात. साऊथच्या जवळपास सर्वच अभिनेत्री सौंदर्यात एकापेक्षा एक आहेत. परंतु काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्यांना आपण मोस्ट ब्यूटीफुल म्हणू शकतो. ‘बाहुबली 2’ या सिनेमाने आतापर्यंत 1700 कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई केलीये. यातील देवसेना ही भूमिका साकारणारी अनुष्का शेट्टी त्यामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अनुष्का शेट्टीने आतापर्यंत अनेक तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा पहिला सिनेमा 2005 मध्ये आलेला ‘सुपर’ हा होता. त्यानंतर तिने ‘डॉन’, ‘किंग’, ‘शौर्यम’, ‘बिल्ला’, ‘अरूंधति’, ‘रगडा’, ‘वेदम’, ‘रूद्रमादेवा’, ‘सिंघम 2’ या सिनेमांमधेय काम केलं. अनुष्का शेट्टीसोबत साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री किती शिकलेल्या आहेत, हे जाणून घेण्याची चाहत्यांना असते. त्यामुळे या अभिनेत्रींची शैक्षणिक माहिती आम्ही घेऊन आलोय.

अनुष्का शेट्टी:
7 नोव्हेंबर 1981ला कर्नाटकच्या मंगलोरमध्ये जन्मलेली अनुष्का 2005पासून सिनेमांत अॅक्टिव्ह आहे. तिने 2005मध्ये ‘सुपर’ या तेलगू सिनेमांतून करिअर सुरुवात करून आतापर्यंत तामिळ-तेलगूमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरची सुरूवात 2005 मध्ये ‘सुपर’ या सिनेमापासून केली होती. अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएट केलंय.

काजल अग्रवाल
19 जून 1985ला मुंबईमध्ये जन्मलेल्या काजलचे नाव तेलगू, तामिळ सिनेमांसाठी ओळखली जात असली तरी सर्वप्रथम ती ‘क्यो हो गया ना’ या बॉलिवूड सिनेमांत झळकली होती. ‘सिंघम’ सिनेमात अजय देवगणसोबत आणि ‘स्पेशल 26’मध्ये अक्षय कुमारसोबत तिने अभिनय कौशल्य दाखवले आहे. 31 वर्षीय काजल अग्रवालने साऊथ सिनेमांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. तिने ‘स्पेशल 26’ आणि ‘सिंघम’ मध्ये काम केलं. त्याआधी तिने ‘मगधीरा’, ‘थुप्पाकी’ आणि ‘चन्दामामा’ सारख्या गाजलेल्या सिनेमातही काम केलंय. काजलच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर काजलने मुंबईतील केसी कॉलेजमधून मास मीडियातून ग्रॅज्यूएट केलंय.

नयनतारा
नयनताराचे मूळ नाव डायना मरियम कुरियन आहे. 18 नोव्हेंबर 1984ला केरळच्या थिरुवल्लामध्ये जन्मलेल्या नयनताराने 2005मध्ये ‘अय्या’ या तामिळ सिनेमातून करिअरला सुरवात केली. याचवर्षी ती ‘गजनी’ सिनेमातून लोकप्रिय झाली. तिने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कानडी भाषेत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अभिनेता-दिग्दर्शक प्रभूदेवासोबतच्या अफेअरमुळे नयनतारा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र त्यांच्या आता वाद झाले असून ते वेगळे झाले आहेत. 32 वर्षीय नयनतारानेही साऊथच्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केल आहे. तिच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर ती मरथोमा कॉलेज, तिरूवल्ला येथून इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्यूएट आहे.

तृषा कृष्णन
त्रिशाचा जन्म 4 मे 1983ला तामिळनाडूच्या चेन्नई शहरात झाला. ती 1999पासून सिनेमांत काम करत आहे. अभिनेत्री होण्यासोबतच ती मॉडेलसुध्दा आहे. तामिळ आणि तेलगू सिनेमांशिवाय तिने बॉलिवूडमध्येसुध्दा काम केले आहे. त्रिशा अक्षय कुमारसोबबत ‘खट्टा-मिठा’ सिनेमांत दिसली आहे. साऊथमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तृषा कॄष्णन. तृषाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. तिने बॉलिवूडच्या ‘खट्टा मीठा’ या सिनेमात काम केलं होतं. तॄषाने चेन्नईच्या एथिराज कॉलेज फॉर वुमनमधून बीबीए केलंय.

श्रिया सरन
तामिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांत श्रियाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. साऊथच्या या बालाचा जन्म 11 सप्टेंबर 1982ला उत्तराखंडमध्ये झाला. ती 2001पासून सिनेमांत अॅक्टिव्ह आहे. ती हिंदी सिनेमांत खास ओळक मिळवू शकली नाही परंतु साऊथ इंडस्ट्रीत जसे तिच्या विना अधूरी आहे. श्रिया सरनने बॉलिवूडच्या ‘मिशन इस्तांबुल’ आणि ‘दृश्यम’ या सिनेमात काम केलंय. तर साऊथच्या ‘संतोषम’, ‘टॅगोर’, ‘शिवाजी द बॉस’, ‘कंदस्वामी’सोबत आणखीही सिनेमात केलंय. श्रियाने दिलीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून लिटरेचरमधून बीए केलंय.

असिन
असिनचे संपूर्ण नाव असिन थोट्टूमकल आहे. 26 ऑक्टोबर 1985ला केरळच्या कोचीन शहरात जन्मलेली असिन एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. साऊथ इंडस्ट्रीत तिची प्रसिध्दी आहेच, परंतु हिंदी सिनेमांसाठीसुध्दा तिला ओळखले जाते. तिने आमिर खान स्टारर ‘गजनी’ सिनेमातून हिंदी सिनेमांत पाऊल ठेवले. त्यानंतर ती अनेक सुपरहिट सिनेमांत दिसली.

नमिता
भैरवी, नमिता किंवा नमिता मुकेश वंकावाला, या अॅक्ट्रेसला तुम्ही तिन्ही नावांनी हाक मारू शकतात. 10 मे 1981ला सूरतमध्ये जन्मलेली नमिता साऊथ इंडस्ट्रीत सेक्स सिंबल रुपात प्रसिध्द आहे. ती तामिळसोबतच तेलगू, इंग्रजी, कानडी आणि मल्याळम सिनेमांत झळकली आहे. ‘लव के चक्कर में’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केलेल्या या अभिनेत्रीला बी-टाऊनमध्ये हवे तसे यश मिळाले नाही.