30 रुपयांत चांगला स्पीड देईल तुमचा जुना पंखा, तुम्ही स्वत: करु शकता हे काम !

253

30 रुपयांत चांगला स्पीड देईल तुमचा जुना पंखा, तुम्ही स्वत: करु शकता हे काम ! सध्या उन्हाळा सुरू आहे आणि अशावेळी जर तुमच्या घरातील सिलिंग फॅनची गती कमी असेल तर तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागेल. जर तुमच्या पंख्याती गती फारच कमी असेल तर तुम्हाला वाटेल की तो आता जुना झालाय त्याचा स्पीड वाढणार नाही, तसेच यात यात चिनी मोटर असल्याचा तुम्हाला संशय येईल. पण कित्येक वेळा हीच दोन कारणे असू शकत नाहीत. तुम्ही अगदी लहान आणि स्वस्त दोन वस्तूंच्या साहाय्याने तुमच्या जुन्या पंख्याचा स्पीड वाढवू शकता. यासाठी फक्त 30 रुपये खर्च करावे लागतील.

बदलावा लागेल कंडेन्सर
पंख्याच्या वरच्या भागात प्लास्टिकच्या वाटीत कंडेन्सर लावलेला असतो. हा करंट कंट्रोल करण्याचे काम करतो पण कधी-कधी माल फंक्शनिंगमुळे तुमच्या पंख्याला व्यवस्थित वीज मिळत नाही आणि त्याचा स्पीड कमी होतो. कंडेन्सरची खराब झाला तर हे होऊ शकते. तुम्ही तो बदलून पंख्याचा स्पीड वाढवू शकता. याची किंमत फक्त 25 रुपये आहे. कंडेन्सर बदलण्याआधी त्याच्या वायरींचा फोटो काढा त्यांनतर त्या बदलण्यास सुरवात करा म्हणजे त्या पुन्हा जोडताना तुमचे कन्फ्युजन होणार नाही. कुठल्याही इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानात कंडेन्सर मिळतो.

बेरींगला ग्रीस लावल्याने वाढेल स्पीड
पंख्यात सगळ्यात खाली बाॅल बेरिंग असते, बेरींगचे ग्रीस कमी झाले तर त्याचा परिणाम पंख्याच्या स्पीडवर होतो. बेरींगला ग्रीस करणे देखील सोपे काम आहे, पण यासाठी तुम्हाला आधी पंखा खाली घ्यावा लागेल त्यानंतर पंख्याचे सगळे नट खोलून मोटर वेगळी करावी लागेल. पंख्याच्या आउटर लेअरमध्ये बेरींग्स असतात. तुम्ही बोट किंवा आणखी कशाने बेरींगला ग्रीस करु शकता. एखाद्या मोठ्या इंजेक्शनची सुई काढून त्यात ग्रीस भरून लावता येऊ शकते. ग्रीस जुने नसावे याची काळजी घ्या. अशा प्रकारे फक्त पाच रुपये खर्च करुन तुम्ही आपल्या जुन्या पंख्याचा स्पीड वाढवू शकता.