तुळशीचे रामबाण उपयोग माहित आहेत का ?

5329

भारताच्या कोणत्याही भागात तुळशीचे रोप आढळते. याचे रोप मोठे झाड बनत नाही. फक्त दीड किंवा दोन फुट वाढते. तुळशीला हिंदु संस्कृतीत खुप पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की, तुळशीचे रोप दारात लावल्यानेच रोग घरात प्रवेश करत नाही. हे रोप हवेला शुध्द करते. तुळशीचे वानस्पतीक नाव ओसीमम सॅन्कटम आहे. अदिवासी देखिल तुळशीचा उपयोग अनेक हर्बल उपयात करतात. चला तर मग आज जाणुन घेऊया तुळशीसंबंधीत जबरदस्त हर्बल उपाय, जे कदाचित तुम्हाला माहीती नसतील.

किडनी
किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, तो मधासोबत 1 महिना नियमित सेवन करा. यामुळे स्टोन मुत्राच्या मार्गाने बाहेर निघुन जाईल.

हृदय रोग
हृदय रोगांसाठी हे वरदान आहे. कारण हे ब्लडमधील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. ज्यांना हृदय रोग असतो, त्यांनी नियमित तुळशीचा रस सेवन करावा. तुळशी आणि हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. कोणताही स्वस्थ व्यक्ती हे सेवन करु शकतो.

पाणी स्वच्छ करते
अदिवासी लोक पाणी शुध्द करण्यासाठी पाण्याच्या पात्रात तुळशीची पाने टाकतात. हे कमीतकमी सव्वा तास पाण्यात ठेवले जाते. यानंतर कपड्याने पाणी गाळुन घेतले जाते आणि मगच पाणी पिण्या योग्य मानले जाते.

संक्रमणमध्ये आराम
अनेक औषधीय गुण असलेल्या तुळशीच्या रसामध्ये थाइमोल तत्त्व असते. ज्यामुळे त्वचा रोगात लाभ मिळतो. पातालकोटच्या अदिवासींनुसार तुळशीच्या पानांना त्वचेवर बारीक करुन लावले तर कोणत्याही प्रकारे संक्रमण होत नाही.

चेह-याचा रंग उजवळ्यासाठी
तुळशीच्या पानांचा रस काढुन त्यामध्ये समान प्रमाणात लिंबुचा रस मिळवा. हे मिश्रण रात्री झोपण्या अगोदर चेह-यावर लावा. यामुळे चेह-यावर सुरकुत्या दिसत नाही, पिंपल्स नष्ट होता आणि चेहरा उजळ होतो.

फ्लू रोगमध्ये फायदेशीर
फ्लू रोगामध्ये तुळशीच्या पानांचा काढा, काळे मीठ मिळवुन प्यायल्याने आराम मिळतो. डांग-गुजरातचे अदिवासी हर्बल जानकार फ्लूच्या दरम्यान तापेनेग्रस्त लोकांना तुळशी आणि काळ्या मीठाचा सल्ला देतात.

कवा दूर करते
हर्बल जानकार तुळशीला थकवा मिटवणारे औषध मानतात. यानुसार जास्त थकवा जानवल्यास तुळशीची पाने आणि मंजुळांचे सेवन करणे योग्य ठरते.

मायग्रेनची समस्या
तुळशीच्या नियमित सेवनाने क्रोनिक-मायग्रेन दूर करण्यासाठी मदत मिळते. रोज दिवसातुन 4-5 वेळा 6-8 पाने चावल्याने काही दिवसात मायग्रेनच्या समस्येपासुन आराम मिळतो.

घामोळ्यांचा उपचार
उन्हाळ्याच्या दिवसात घामोळ्यांच्या उपचारासाठी डांग-गुजरातचे अदिवासी संत्र्याच्या सालांना सावलीत वाळवुन पावडर तयार करतात. यामध्ये थोडे तुळशीचे पाणी आणि गुलाबजल मिळवुन शरीराला लावतात. असे केल्याने तात्काळ आराम मिळतो.