सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; उबरने बंद केल्या सेवा !

227

सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; उबरने बंद केल्या सेवा. अमेरिकेत सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅरिझोना येथे झालेला हा अपघात सेल्फ ड्रायव्हिंग कारने झालेला पहिला जीवघेणा अपघात आहे. या दुर्घटनेनंतर उबरने समस्त उत्तर अमेरिकेत अशा प्रकारच्या कारच्या सेवा आणि टेस्टिंग बंद करत असल्याची घोषणा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, सेल्फ ड्रायव्हिंग कार ह्या सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच जगभरात विविध कंपन्या यांच्यावर चाचण्या घेत आहेत. त्यामध्ये टेस्ला, फोर्ड मोटर्स आणि वायमो अशा कंपन्यांचाही समावेश आहे.

रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, इलेन हेजबर्ग नावाची महिला रविवारी रात्री पायी जात होती. ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर चालणाऱ्या वॉल्वो कारने त्या महिलेला जोरदार धडक दिली. 49 वर्षीय पीडीतेला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

उबरचे सीईओ म्हणाले.
उबरचे सीईओ दारा खोस्रोवशाहीने अपघातावर शोक व्यक्त केला. तसेच चौकशी करणार असल्याचे आश्वास दिले. त्यांनी केलेल्या ट्विटप्रमाणे, “अॅरिझोनातून वाइट बातमी आहे. आम्हाला सध्या पीडित महिलेच्या कुटुंबियांची चिंता वाटते आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या चौकशीला आम्ही पुरेपूर सहकार्य करणार आहोत.”
अमेरिकेचे वाहतूक मंत्री इलेन चाओ यांनी सांगितल्याप्रमाणे, तंत्रज्ञान आणि कार कंपन्यांना सेल्फ ड्रायव्हिंग कार विषयी लोकांच्या मनात असलेल्या भितीवर काही करावे लागणार आहे. एका सर्वेक्षाणात 78 टक्के लोकांनी आपल्याला सेल्फ ड्रायव्हिंग कारने अपघाताची भिती वाटते असे म्हटले होते असा उल्लेख त्यांनी केला. एका सर्वेक्षाणात 78 टक्के लोकांनी आपल्याला सेल्फ ड्रायव्हिंग कारने अपघाताची भिती वाटते असे म्हटले होते